मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- इनरव्हील क्लब ऑफ हिंगणघाट व विद्या विकास शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानेआज भारत देश सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश आहे ज्याकडे पूर्ण विश्वशक्ती म्हणून बघितल्या जाते. परंतु या युवाशक्ती ला घातक अशा अनेक गोष्टी आज समाजात दिसून येतात त्यातच एक आहे अमली पदार्थ्यांचे सेवन. याला निर्बंध घालण्यासाठी सर्वप्रथम आहे ते जनजागृती. इनर व्हील क्लब ऑफ हिंगणघाट हा जनजागृती मध्ये नेहमीच पुढाकार घेत असतो. 7 ऑगस्ट 2025 ला तरुणांमध्ये अमली पदार्थ्यांचे सेवन प्रतिबंध जागृती असा कार्यक्रम विद्या विकास शिक्षण संस्थे च्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला.
ज्यात प्रमुख वक्ते म्हणून पोलीस अधीक्षक वर्धा अनुराग जैन, मनोचिकित्सक सलाहकार व मानसोपचार तज्ञ डॉ. मोसम फिरके, नागपूर उपास्थित होते. एसपी अनुराग जैन सरांनी, अमली पदार्थ सेवणाच्या व विक्री करण्याच्या संदर्भात पोलीस यंत्रणा कशी काम करते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मते अमली पदार्थांचा व्यावसाय कराऱ्या या समाजकंटकाचे पाळमूळ एवढे खोलवर आहे, आणि त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी समाजाचा जबाबदार नागरिक म्हणून शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचा याला सहयोग मिळावा असे आवाहन केले.
समुद्रपूर पोलीस ठाण्यातले श्री रेवतकर यांनी अमली पदार्थ कोणते, त्यांचा दुष्परिणाम एकंदरीत सेवन करणाऱ्याच्या आयुष्यावर कसा होतो, त्या व्यक्तीची लक्षणें काय याबद्दल विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली व सोबतच अशी व्यक्ती आढळल्यास लगेच आपल्या शिक्षक, पालकांना व पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले. अमली पदार्थ्यांचे सेवन करणारा, त्यांची विक्री करणारा यासाठी भारतीय न्यायव्यवस्थेत असणारी तरतूद असणाऱ्या एनडीपीएस कायदा 1985 याबद्दल माहिती दिली. मागील एक वर्षात गांजा सेवणाचे 21 गुन्हे व मेफेड्रोन सेवणाचे 7 गुन्हे, 16 आरोपीन्ना शिक्षा व मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याचे सांगितले. आणि याचा प्रतिबंध जागृती साठी 26 जून 2025 रोजी आरोग्य सेविका, विद्यार्थी, नागरिक, पोलीस यंत्रणा यांनी मिळून एक रॅली काढली ज्याचे ब्रीदवाक्य असे होते “होत आहे उध्वस्त आमची तरुण ही मंडळी, नशेच्या ह्या चक्रमध्ये गुंतली जी सगळी आणि रॅली च्या माध्यमातून हा संदेश दिला.
व्यसनमुक्त समाज घडवू या, आनंददायी जीवन जगू या. तसेच पोलीस यंत्रनेकडून तत्काळ मदत मिळावी यासाठी helpline no. 112, अमली पदार्थ सेवन व विक्री आठळल्यास टोल फ्री नंबर- 1800-11-0031, सायबर गुन्ह्यासाठी टोल फ्री नंबर- 1930 आणि लहान मुलांच्या संरक्षण टोल फ्री नंबर- 1098 सर्वांना देण्यात आला. यानंतर मानसोपचार तज्ञ डॉ. मोसम फिरके यांनी कशापद्धतीने कुणी व्यक्ती अमली पदार्थ सेवनाच्या जाळ्यात अडकतो त्याची अनेक कारणे सांगताना प्रामुख्याने सांगितले की मित्रांचा दबाव, कुतूहल, ताण तणाव निराशा व एकटेपणा ही कारणे आहेत. यातून कुणाला व्यसन लागले तर त्यांचे गंभीर परिणाम त्यांच्या एकंदरीत आयुष्यावर कसे होतात हे सांगितले. यातून वाचायचे असेल, कुणाला वाचवायचे असेल तर त्यांना बोलते करणे, आश्वस्त करणे व वेळीच त्यांना या जाळ्यातून सोडवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे हे नमूद केले.
तज्ञ मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरांचे सत्र खुले केले ज्यात बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. असे कार्यक्रम वारंवार आणि प्रत्येक ठिकाणी व्हावी अशी इच्छा सर्व मान्यवरांनी प्रकट केली. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष उमेश तुळसकर, विशेष अतिथी डॉ. नयना तुळसकर, इनर व्हील क्लब अध्यक्ष कुमुद व्यास, सुशील कुमार नायक (DYSP, हिंगणघाट), पोलीस निरीक्षक हिंगणघाट राऊत, इनर व्हील क्लब च्या सर्व सदस्या, विद्या विकास संस्थेअंतर्गत सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. अपर्णा मुडे ज्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व प्रोजेक्ट सेक्रेटरी वर्षा बोंगीरवार या होत्या. आभार प्रदर्शन इनर व्हील क्लब ऑफ हिंगणघाट च्या सेक्रेटरी सारिका डोंगरे यांनी केले. व प्रमुख वक्त्यांचे सन्मानचिन्ह देऊन आभार व्यक्त केले.

