सामाजिक कार्यकर्ते अमोल मुक्कावार आणि कार्यकर्ते कडून अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्फतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन.
मधुकर गोंगले, उपसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- अवकाळी पावसामुळे मागील मे महिन्याच्या दिनांक 30 मे 2025 रोजी नैसर्गिक आपत्ती पाऊस, वादळवारा, मेघगर्जनेसह गारपीठ पडून घरांचे मोठ्या प्रमाणात छपरे, टिन, कवेलू तांदूळ, गहू इत्यादी जीवन आवश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासंबंधी चेरपल्ली व गडअहेरी, गडबामणी गावातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते अमोल मुक्कावार,अमोल रामटेके व त्यांचे मोठे बंधू अरुण रामटेके यांना माहिती देऊन तहसील कार्यालयाचे प्रतिनिधींना बोलावून येथील तलाठीकडून पंचनामा देखील करण्यात आले होते मात्र महिने उलटून गेले तरी गावकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.
त्यामुळे गावातील नागरिकांनी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल मुक्कावार यांना माहिती देऊन अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
यावेळी निवेदन देतांना सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अमोल मुक्कावार, अरुण रामटेके, अमोल रामटेके यांच्यासह नुकसान झालेले चेरपल्ली गावातील आयलेश कात्रेलवार, अरुण कांबळे, दशरथ सूनतकर, श्रीमती माया दुर्गे, शामराव कांबळे, मलया कोंडावार, मोहन कांबळे, शांता उडतावार, इत्यादी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

