संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे शाळेच्या परिपाठात विद्यार्थी सुरक्षा समितीच्या उपाक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना संकटच्या वेळी प्रसंगावधान साधून आपला बचाव कसा करावा याबाबतचे कृतीयुक्त धडे देण्यात आले. इन्फंट काँन्व्हेंट येथे मागील वर्षापासून आठवड्यातून मंगळवार, गुरुवारला कराटे प्रशिक्षणाचे धडे देण्यात येतात. त्याचा कृतीयुक्त सराव घेण्यात आला. त्यात काही विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला व आपले योग्यरित्या सादरीकरण केले.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा आलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, कराटे प्रशिक्षक प्रवीण मंगरूळकर, प्रिया मंगरूळकर, समितीचे सचिव पुंडलिक वाघमारे, स्काऊट शिक्षक सुभाष पिंपळकर, गाईड शिक्षिका संगीता लांडे, समितीचे सदस्य हर्षल क्षीरसागर, सुधीर सर तसेच वर्ग 1ते 10 वा वर्गातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे लक्षपूर्वक सादरीकरण समजून घेऊन संकटाच्या वेळी प्रसंगावधान साधून आपला बचाव कसा करावा हे जाणून घेतले व या उपक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी करण्यात आली.

