युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन नागपूर:- जिल्हातील कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पार ढेपाळलेला असून रुग्ण आधी व कर्मचारी नंतर अशी परिस्थीती झाली आहे. वैघकीय अधिकारी आठवड्यातून फक्त एकदाच येत असल्याने जिल्हा प्रशासनाचा ईथे वचकच राहलेला नाही त्यामुळे हे रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा, असे झालेले आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराप्रती रुग्णांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कळमेश्वरात तालुकास्तरावर पहिले व सर्वात जुने असे ४० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. रुग्णालयात एका अधीक्षकासह चार डॉक्टर्स, परिचारिका, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, शिपाई व ईतर असा मोठा स्टाफ आहे. रुग्णालयाचे कामकाज सकाळी नऊ ते बारा व सायंकाळी च्यार ते पाच यावेळात आहे.या रुग्णालयाची दररोज ३५० च्यावर ओपीडी असताना ईथले कामकाज साडेनऊ वाजता नंतर सुरू होते आहे. त्याआधीच रुग्ण व नातेवाईक दवाखान्यात हजर झालेले असतात.अनेक कर्मचारी साडेदहा नंतर रुग्णालयात दाखल होतात. कर्मचारी अवेळी येतात. त्याचा रुग्णांना व नातेवाइकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. प्रशासनाला कर्मचारी कधी येतात व कधी जातात याचा कूणालाच थांगपत्ता असत नाही.
तसासनीस आलेल्या रुग्णांची येथील डाॅक्टर दूरुनच पाच फुटांवरुन तपासणी करत असल्याचा गंभीर प्रकार सर्रासपणे बघायला मिळतो आहे. डाॅक्टरांकडूण तपासणी तर दूरच रुग्णाला काय समस्या आहे हे विचारुनच औषधी लिहल्या जात आहे. ग्रामीण गरजु रुग्णांच्या उपचारासाठी हे रुग्णालय संजीवनी असायचे, मात्र, जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मीटिंगमुळे सातत्याने गैरहजर राहत असल्याने प्रशासनावर वचक उरला नाही. येथील वैघकिय अधिकारी हे दररोज नागपूर येथे मिटींगला गेले असतात. नागपुर रुग्णालयाला रुग्णवाहीका असून त्या नसल्यात जमा झाल्या आहे. रुग्णांना गरजेच्यावेळी रुग्णवाहीका उपलब्धच होत नाही नेमकी ती कूठे असते याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे. येथील डाॅक्टरांकडूण येणार्या रुग्णांना थेट खाजगी रुग्णालयांत वळते केल्या जात असून तेथील मिळनार्या कमीशनवरच डाॅक्टरांची उपजीविका होत असल्याचे बोलल्या जात आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी येणार्या महिलांना कर्मचार्यांकडूण असभ्य वर्तन केल्या जात आहे.कमीशनच्या हव्यासापोटी चक्क खाजगी रुग्णालयांत प्रसूती केल्या जात असल्याने हे रुग्णालय अडचनीचे ठरते आहे.
रुग्णालयात औषधींचा प्रचंड तुटवडा असून, अनेक रुग्णांना औषधी ही बाहेरुनच नाहक घ्यावी लागत आहे.हा प्रकार येथे वारंवार होत आहे. आवारात ठिकठिकाणी असणारी अस्वच्छता, बगीच्यातील साचलेली घान, विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवाच सलाईनवर असल्याची भावना रुग्णांमध्ये निर्माण होत आहे. रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांना खाजगी दवाखान्याचा सहारा घ्यावा लागतो आहे. विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे. त्याच बरोबर औषधींचा तुटवडा जानवत असून बॅडेंंज पट्टीपासून ते दररोज रुग्णांना लागणारी अनेक औषधी रुग्णालयात नाहीत. अनेक डॉक्टर रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास भाग पाडतात. दररोज येणाऱ्या रुग्णांची तपासणी व्हिजीट डॉक्टरांकडून करून घेण्यात येते. तज्ज्ञ डॉक्टर ओपीडी काढत नसल्याने नियमित रुग्णांची तपासणी करण्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आदी डॉक्टरांचा सहारा घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे दवाखान्यामध्ये रुग्णाला रुग्णांचे हाल प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. रुग्णांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. ठिकठिकाणी कचर्यांचे ढिगारे, शौचालयातील स्वच्छतेचा अभाव व दूर्गंधीने रुग्णांचा जीव कासाविस होत आहे.
या शिवाय रुग्णालयातील अनेक विभागात डॉक्टरांची गरज असते. तात्पुरत्या सेवा देणारे डॉक्टर खाजगी सेवा देण्यास जास्त महत्त्व देत असल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रुग्णालयातील मोडकळीस आलेला कारभार सुधारावा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकातून होत आहे.
“रुग्णालय रामभरोसे रुग्ण भगवान भरोसे: रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दररोज येत नसल्याने रुग्णालयातील कर्मचारी, सफाई कामगार व इतर रुग्ण सेवक यांच्यावर नियंत्रण राहिले नाही. कोणताही कर्मचारी केव्हाही निघून जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे.”

