विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दिनांक 10 ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशन एटापल्ली हद्दीत QRT एटापल्ली यांच्या नाकाबंदी अभियान दरम्यान दुचाकी स्वार नाकाबंदीतून संशयतरित्या पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस उप निरीक्षक कडव व त्यांच्या टीमने त्यांचा सिताफिने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस करता ते उडवा उडवी चे उत्तरे देऊ लागले यावरून आणखीच संशय बळवल्याने त्यांच्या बॅगची झडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये सात किलो गांजा मिळून आला.
तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई उप विभागीय पोलिस अधिकारी एटापल्ली चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे, महिला पोलिस उप निरीक्षक रोहिणी गिरवलकर, पोलीस उपनिरीक्षक साखरे, पो उप नि आकाश कडव, Qrt जवान, पोहवा भिवा हिचामी, पोलिस शिपाई मोहन शिंदे व चालक पोलिस हवालदार गावडे यांच्या टीम ने एटापल्ली येथिल अंडा चौक येथे जाऊन कारवाई केली व मिळून आलेल्या गांजा जप्त करून एटापल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात सहभागी असलेले आरोपी सतीश मंडल व मिथुन जयदार दोन्ही आरोपी मूळचे रा पाखंजूर जिल्हा कांकेर छत्तीसगड येथील असून आरोपीस अटक केली आहे.
सदरचा माल हा गडचिरोली जिल्ह्यात बंदी असल्याचे माहीत असून देखील आरोपीने बेकायदेशीरपणे विक्रीकरिता बाळगून ठेवल्याने आरोपी विरुद्ध एटापल्ली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उप निरीक्षक रोहिणी गिरवलकर या करीत आहेत.

