मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- देव, देश, धर्म ही आपल्या जीवनातील अविभाज्य अंग आहेत. या तिन्हींचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. देव, देश, धर्म या तीन गोष्टी घेऊन पुढे चालणे ही काळाची गरज आहे कारण माओवादी नक्षलवादी यांचा ग्रामीण भागात प्रभाव कमी होत असून सरकारने अनेक ठिकाणी माओवादी नक्षलवादी यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे माओवादी नक्षलवादी यानी आता आपला मोर्चा हा विद्यापीठाच्या माध्यमातून तरुण युवकांना भडकवून देशद्राही कार्य करताना दिसतात. माओवादी नक्षलवादी हे तरुणाचे डोके फिरवीत आहे. अभिनव विचार मंच सारख्या सज्जन शक्तीने समाजातील शिक्षण, वृक्षारोपन, आरोग्य या कार्यासोबत समाजातील विघातक कार्यावर सुद्धा लक्ष ठेवण्याची गरज आहे असे विचार आमदार समीर कुणावार यानी व्यक्त केले ते स्व. र्डॉ.रामदासजी आंबटकर योग भवनाचा लोकार्पण सोहळा निमित्य कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसगी मंचावर अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा नॅक कमिटी सदस्य मुरलीधर चांदेकर, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, जिल्हा परिषद वर्धा चे माजी शिक्षण सभापती वसंतराव आंबटकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार समीर कुणावार म्हणाले की, अभिनव विचार मंच योगाच्या माध्यमातून चांगले काम करीत आहे परंतु नवीन पिढी चांगली घडली पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे कारण आजचा तरुण व्यसनाधीन होत असतानाच कुमारी मातेचे प्रमाण शहरा शहरात वाढत आहे तेव्हा अभिनव विचार मंच ने शाळा कॉलेजमध्ये जावुन प्रबोधन कार्यशाळा कार्यक्रम घ्यावेत. व्यक्तींना निरोगी जीवन जगण्याकरता योगाची आवश्यकता आहे योगामुळे व्यक्तीचा कार्यपद्धतीवर विचारसरणीवर परिणाम होतो भारतीय ऋषीमुनींनी दिलेला योग हा आज जगाने स्वीकारलेला आहे याचा खूप आनंद होतोय. अभिनव विचार मंच नेहमी सकारात्मक विचार घेऊन पुढे जात ते नेहमी चांगल्या गोष्टीचा पुरस्कार पुढाकार घेत असते चांगली समाज पिढी घडविणाऱ्या साठी अभिनव विचार मन सतत काम करते.
डॉक्टर स्वर्गीय रामदास आंबटकर योग भवन हे भवन यापुढे देखरेख व अन्य कामाकरता अभिनव शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संस्था या संस्थेकडे सुपूर्त करावे अशी सूचना त्यांनी मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना केली व ती त्यांनी लगेच मान्य करून यापुढे अभिनव विचार मंच कडे या योग भवण्याचा ताबा राहील अशी घोषणा केली तसेच योग भवनाच्या आजूबाजूला सौंदर्यकरणचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार समीर कुणावर यांनी दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय धात्रक यानी केले तर संचालन नितीन सुकळकर यानी आभार प्रदर्शन प्रा. चंद्रशेखर रेवतकर यानी केले. या कार्यक्रमाला नगरातील पतजंली परीवार व गनमान्य व्यक्ती , अभिनव विचार मंच चे शिलेदार जेष्ठ नागरिक उपस्थित होते. विजय गांवडे याच्या वंदेमातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

