संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतदार यादीत घोटाळे करून, मतचोरीद्वारे सत्तेवर आरूढ झाल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप असून, ही केवळ राजकीय बाब नसून प्रत्येक मतदाराच्या विश्वासाचा व लोकशाहीचा अवमान असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. भारतीय लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या हाकेला प्रतिसाद देत १४ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता चंद्रपूर शहरात “मतदान चोर, खुर्ची सोड” असा घोष देत भव्य कॅंडल व मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस आणि शहर जिल्हा काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौकातून सुरू झालेला मोर्चा जटपूरा गेटपर्यंत जल्लोषात निघाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर राष्ट्रीय महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. यावेळी घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. मोर्चात काँग्रेसच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे हा मोर्चा जनशक्तीचे भव्य प्रदर्शन ठरला.
या मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदाताई धोबे, शहर महिला जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश अडूर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषसिंह गौर, विनायक बांगडे, विनोद दत्तात्रेय यांनी केले. यावेळी शिवसेना (उबाठा) अध्यक्ष संदीपभाऊ गिर्हे, अरुण धोटे, दिनेश चोखारे, घनश्याम मूलचंदानी, मनीष तिवारी, राजू रेड्डी, प्रवीण पडवेकर, डॉ. अभिलाषा गावतुरे, माजी महापौर संगीता अमृतकर, सुनीता लोढिया, नंदू नागरकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, सोहेल रजा, गोपाल अमृतकर, बापू अंसारी, अनिरुध वनकर, युसूफ भाई, रोशनलाल बिट्टू, देवेंद्र आर्या, उमाकांत धांडे, दिपक कटकोजवार, संगीता भोयर, विना खनके, सकीना अंसारी, अमजद अली, खुशबू चौधरी, वसंता देशमुख, राहुल चौधरी, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष सागर खोबरागडे, इंटक युवा अध्यक्ष प्रशांत भारती, एनएसयूआय अध्यक्ष शफाक शेख यांच्यासह शेकडो नागरिक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मोर्चा संपन्न होताना “लोकशाही वाचवा, संविधान वाचवा” हा संदेश देत नागरिकांनी सरकारच्या हुकूमशाही विरुद्ध ठाम लढ्याचा संकल्प करण्यात आला.

