१६ ते १८ ऑगस्ट असे तीन दिवस चालणार श्री.बाबा ताजुद्दीन बाबा दर्गा वाकी येथे पुण्यतिथी शताब्दी महोत्सव
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- पाटणसावांगी येथून जवळ असलेल्या सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या श्री.क्षेत्र वाकी दरबार येथे बाबा ताजुद्दीन यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री संत ताजुद्दीन बाबा यांनी १७ ऑगस्ट १९२५ ला महासमाधी घेतली. त्याला १७ ऑगस्ट ला १०० वर्ष पुर्ण होत आहे.
या शताब्दी महोत्सवाचे आयोजन दरबार ट्रस्टद्वारे १६ ते १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिने अभिनेता राज बब्बर तसेच देशभरातील संत, महात्मा व हजारो श्रद्धालु भक्तगण सहभागी होतील.
१६ ऑगस्टला सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत दिंडी पालखी चे आगमन होईल. सद्गुरु अवधूत दादा गुरु (अखंड निराहार सिद्ध महायोगी) यांच्या हस्ते उद्घाटन आणि मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रल्हाद पटेल (मंत्री मध्य प्रदेश) राहतील, तर स्वागत आशिष देशमुख आमदार सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र करतील तसेच प्रमुख उपस्थितीत यजमान आमदार मोहन मते आणि श्रीमंत राजे रघुजी भोसले महाराज, श्रीमंत राजे डॉ. मुधोजी भोसले महाराज, डॉ. वैभव अलोणी महामंडलेश्वर गणेश मठ बिछवा (म.प्र.), सौ.अन्नपूर्णाताई डहाके (सरपंच वाकी) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार. संध्याकाळी ७ ते १० पर्यंत हाजी मुकर्रम वारसी (भोपाल) यांची सुफियाना कव्वालीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१७ ऑगस्ट ला सकाळी ९ वाजता महाअभिषेक व महापूजन पार पडेल. सकाळी ११ वाजता कल्की पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णन यांचे प्रवचन तसेच मौलाना सय्यद शहा गुलाम अफजल बियाबानी (तेलंगाणा), विवेकजी महाराज (राजना) यांचे उदबोधन होईल. दुपारी १२ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कलश पूजन व स्थापना करण्यात येईल. तसेच आध्यात्मिक प्रार्थना स्तोत्राचे प्रकाशन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित राहतील. तसेच स्वागताध्यक्ष आशिष देशमुख आमदार सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र राहतील. प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार श्यामबाबू बर्वे रामटेक लोकसभा क्षेत्र, आमदार मोहन मते, चरणसिंग ठाकूर, प्रवीण दटके, कृष्णाजी खोपडे, नितीन राऊत, विकास ठाकरे, कृपाल तुमाने (विधान परिषद महाराष्ट्र), माजी मंत्री सुनील केदार, प्यारे जिया खान, जरबीर बाबा ताजी तनविरूद्दिन, डॉ. सुफी राज जैन यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडेल. सायंकाळी ७ वाजता मुस्तफा अजीज नाजा (मुंबई) यांचा सुफियाना कव्वालीच्या कार्यक्रम होईल.
१८ ऑगस्टला सकाळी १० वाजता ह.भ.प. प्रभाकरदादा बोधले (श्री संत माणकोजी महाराजांचे वंशज) यांचे गोपाल काल्याचे किर्तन होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य उपस्थित राहतील. त्यांच्या हस्ते सभागृहाचे लोकार्पण करण्यात येईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष देशमुख, सिनेस्टार राज बब्बर आमदार मोहन मते, डॉ. वैभव अलोनी उपस्थित राहतील. वाकी दरबार ट्रस्ट अध्यक्ष प्रभाकरजी डहाके पाटील, सचिव ज्ञानेश्वरजी डहाके पाटील, विश्वस्त मधुकरराव टेकाडे, किशोर चिंद्दरवार, सचिन डांगोरे, यांनी आव्हान केले की सर्व भक्तांनी उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

