महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दिल्ली:- येथून एक संतापजनक माणुसकीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. एका 39 वर्षीय नराधम मुलाने आपल्या 65 वर्षीय आईवर 3 वेळा बलात्कार केला. हज यात्रेवरुन घरी परत आल्यानंतर त्याने हे संतापजनक कृत्य केले. या नराधम मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या नंतर चौकशीत त्याने असे उत्तर दिले की पोलिसांशी एकच धक्का बसला आहे.
मुस्लिमांच्या पवित्र सौदी अरेबियातील हज तीर्थयात्रे वरून महिला मध्य दिल्लीतील हौज काझी भागात असलेल्या आपल्या घरी परतल्यानंतर नराधम मुलाने त्याला जन्म देणाऱ्या आईवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पिढीत महिलेने आपल्या 25 वर्षीय मुलीसह हौज काझी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन आपल्या नराधम मुलाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. मोहम्मद फिरोज उर्फ सुहेल असे आरोपीचे नाव आहे. या महिन्यात तिला अनेक वेळा मारहाण आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप या महिलने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी पिढीत महिला आपल्या 72 वर्षीय पती आणि मुलीसह हज करण्यासाठी सौदी अरेबियाला गेली होती. प्रवासा दरम्यान, तिच्या मुलाने तिच्या पतीला फोन करून तिच्यावर “वाईट चारित्र्याचा” आरोप केला आणि त्याच्या वडिलांना ताबडतोब दिल्लीला परत येऊन घटस्फोट देण्यास सांगितले. 1 ऑगस्ट रोजी, कुटुंब घरी परतल्यानंतर, आरोपीने त्याच्या आईवर हल्ला केला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या सुरक्षिततेच्या भीतीने ती काही काळ तिच्या मोठ्या मुलीच्या सासरच्या घरी राहण्यासाठी गेली. तिने आरोप केला आहे की 11 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 च्या सुमारास ती घरी परतली तेव्हा तिच्या मुलाने तिच्याशी एकटे बोलण्याचा आग्रह धरला. त्यानंतर त्याने तिला एका खोलीत बंद केले, चाकू आणि कात्रीने धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला.
धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या कृत्याचा आरोपी मुलाला थोडाही पश्चाताप नाही. आरोपीच्या आईने पोलिसांना सांगितले की, तिच्या मुलाने वाटत होते की, आपल्या आईचे अनेक वर्षांपूर्वी विवाहबाह्य संबंध आहेत. याचाच राग मनात धरुन आरोपीने आईला शिक्षा देण्यासाठी तिच्यावर अत्याचार केला.

