संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस हायस्कूल, राजुरा येथे शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका व भविष्यासाठी शिक्षण धोरणे आणि तंत्रे याबाबतची माहिती देण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यात अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, सक्रिय शिक्षण, अनुभवात्मक शिक्षण, मिश्रित शिक्षण, केस – बेस्ड लर्निंग, संशोधन – केंद्रित शिक्षण, आंतरविद्याशाखीय शिक्षण, मार्गदर्शन आणि सल्ला, तंत्रज्ञान एकत्रीकरण, मूल्यांकन, जागतिक शिक्षण अशा विविध बाबीचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक अजय फुलझेले, सहमार्गदर्शक सदन मलिक व आशिष सर हे होते.
या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका या कार्यशाळेला उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन साक्षी चव्हाण यांनी केले तर आभार अमर मेश्राम यांनी मानले.

