संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस काँन्व्हेंट येथे कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. ह्यामध्ये बालगोपालांनी सुंदर कृष्णा आणि राधिकेची वेशभूषा साकारली होती. ह्या कार्यक्रमात काही पालकांनी कृष्ण जन्मावर आधारित वेशभूषा केली होती. तसेच काही पालकांनी सुंदर भजन गायले, नृत्य केले. यावेळी पालक वर्गासाठी मटका फोड ह्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नीता जक्कनवार यांनी तर आभार प्रदर्शन सीमा सिंग यांनी केले.

