युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन उमरेड:- पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या धुरखेडा येथे अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांच्या माध्यमातून अंगणवाडी मध्ये स्तनपान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला रुग्णसेवक संजय लोखंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर यांच्याकडून अभिवादन करण्यात आले व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.
यावेळी प्रमिला वासे यांनी स्तनपान विषयी महिलांना आरोग्य आहार विषयी व स्वच्छता विषयी गावकऱ्यांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला दर्शना गायकवाड, निर्मल मून, पायल सुके, शितल बोरकर, लीला मेश्राम, मिलिंद लोखंडे व व गावकरी नागरिक उपस्थित होते.

