युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- शहरात व तहसील कार्यालयात व ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन ध्वजारोहणान मोठ्या उत्साहात पार पडला. कळमेश्वर तहसील कार्यालयात. तहसीलदार विकास बिक्कड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी नायब तहसीलदार संदीप तडसे ज्योती जाधव समन्वय व पुनर्विलोकन समितीचे डॉ. राजीव पोतदार संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अजय वाटकर, कळमेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी मंगेश ढवळे, बिलाल खान, पवन चव्हाण व शहरातील पत्रकार आशिष सौदागर लोकमत जयंत अढाऊ दैनिक पुण्यनगरी युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनेल नागपूर जिल्हा प्रतिनिधी महासागर प्रतिनिधी व शहरातील मंडळी उपस्थित होते मंडळी उपस्थित होती.
कळमेश्वर ब्राह्मणी नगरपरिषद कार्यालयात बाजार चौकातील झेंडा चौकात मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रकाश वरुळकर महादेव इखार सुरेश डोंगरे नगरपरिषदेचे अभियंता अनिल कोंडे, नीतू कोकणकर, प्रशांत कोयता डे, प्रीतम कदम, कांतीलाल सैदाने, श्रेयस होनमारे, निशिकांत पाटील, सतीश धोटे उपस्थित होते.
कळमेश्वर नागरिक पतसंस्था येथे संस्थेचे संचालक गिरधर श्रीखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष डॉ राजीव पोतदार उपाध्यक्ष प्रकाश वरुळकर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनंदा लंगडे व संचालक मंडळ व सभासद वर्ग उपस्थित होता. कळमेश्वर भाजपा कार्यालयात माजी सैनिक राहुल चांदुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, धनराज देवके, शहराध्यक्ष प्रतीक कोल्हे, मनीषा लंगडे, निलेश कोहाड, अजय बोरे, अरविंद दुबे, सचिन रघुवंशी, प्रवीण काथवटे, रशीद शेख याधी उपस्थित होते.

