मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २१ ऑगस्ट रोज गुरुवारला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे तसेच तालुकाप्रमुख मनीष देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंगणघाट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळ्या करिता आले असता. त्यांना स्थानिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मध्ये नगरपरिषद हिंगणघाट द्वारा अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजना, तथा नवीन पिण्याचे पाण्याची १२ टाकी, तसेच संपूर्ण शहरात नळ पाईपलाईन बसविण्याचे कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे .त्याची सखोल चौकशी शासनामार्फत करावी याकरिता निवेदन देण्यात आले.
सविस्तर अशी की, अमृत योजना अंतर्गत नगरपरिषद्वारा भूमिगत गटात योजना तथा पिण्याच्या १२ पिण्याचे पाण्याची टाक्या तसेच संपूर्ण शहरात नवीन नळ पाईप जोडणे याकरिता शासनाच्या वतीने जवळपास रु:-१६७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.सन २०१६ ते २०२० पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं. परंतु अजून पर्यंत ही दोन्ही कामे पूर्ण होऊ शकली नाही. व जनतेच्या सेवेत अजून पर्यंत कार्यान्वित झाली नाही. या कामाचे देखरेख महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यावतीने करण्यात आले. भूमिगत गटार योजने करीता रुपये ८१ कोटी तरतूद करण्यात आली होती. तसेच अमृत योजनेअंतर्गत नवीन पिण्याच्या १२ टाक्या नवीन पाईपलाईन न जोडणी करिता तसेच फिल्टर प्लांट इत्यादी करीता शासनामार्फत ८१ कोटी मंजूर झाले. यातील एस.टी.पी प्लांट ची जागा चुकीची निवडल्यामुळे तो एस.टी.पी प्लांट पाण्याखाली आला आहे. तसेच शहरातील १९५०० घरांची भूमिगत गटार लाईन जोडणी ही पहिल्या टप्प्यात पूर्ण व्हायला पाहिजे होती. परंतु आतापर्यंत फक्त १२००० पूर्ण झाली आहे. उर्वरित निधीच्या अभावी जवळपास एकूण ७८०० जोडणी अजून बाकी आहे .असा अहवाल नगरपरिषद प्रशासन द्वारे आम्हाला दिला. परंतु या दोन्ही कामाकरता निधी किती वापरला गेला आणि सध्या स्थितीत किती शिल्लक आहे. याबद्दल कुठलाही लेखाजोखा स्पष्ट झाला नाही.
म्हणून आपणास विनंती करण्यात येते की ,महाराष्ट्र शासना द्वारे इतक्या मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता होऊन सुद्धा, नागरिकांना या योजनेची सेवा पूर्ण देऊ शकत नाही. या योजने पासून स्थानिक जनता वंचित आहे. आपण या संदर्भात या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. याकरिता महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन सांगण्यात आले.
निवेदन देण्याकरिता उपतालुका प्रकाश अनसाने ,शंकर झाडे, शहर प्रमुख चंद्रकांत भुते, भास्कर ठवरे, नितीन वैद्य, सुनील आष्टीकर, अनंता गलांडे, गजानन काटवले, सतीश मसराम ,दिलीप वैद्य, भास्कर भिसे, निलेश भगत, विशाल माथनकर ,फिरोज पठाण,विलास चौधरी, शकील अहमद, हिरामण आवारी, श्रीकृष्ण रामगडे ,बलराज डेकाटे, विजय कोरडे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

