आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम पतीने आपल्याच पत्नीची हत्या करून दृश्यम स्टाईलने मृतदेह घरातच पुरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना आज 5 वाजताच्या सुमारास समोर आली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण हिंगणघाट शहरात खळबळ माजली आहे. सुभाष वैद्य राहणार ओंकार नगर येनोरा माता मंदिर परिसर असे आरोपी पतीचे नाव असून तो सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष याने अगदी शांत डोक्याने आपल्या पत्नीची हत्या केली. काही दिवसा अगोदर त्याने शौचालय बांधकाम करायचं आहे असे सांगून जेसिपी मशीनच्या मदतीने खड्डा खोदून ठेवला होता. त्यानंतर त्याने पत्नीची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर त्या खड्ड्यात तिला पुरले आणि काहीच नाही झालं अस वागत होता. त्यानंतर तो पसार झाला. नवीन वस्ती असल्यामुळे परिसरात जास्त घर नाही. आजूबाजूला काही नागरिकाचे घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे घर बांधकाम करणाऱ्या कामगारांना खड्ड्यातून मोठ्या प्रमाणात वास येत असल्याने त्यानंतर संशय वाढताच पोलिसांना माहिती दिली. याची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि तपासाला सुरुवात केली.
ही घटना अंदाजे 3 ते 4 दिवसांपूर्वी घडली मृतदेह घरातच गुपचूप पुरून त्यावर माती टाकून तो बुजविण्यात आला. असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता विजयचा मृतदेह घरातच जमिनीखाली गाडलेला आढळला.
आरोपीची ही मृतक दुसरी पत्नी:
आरोपी सुभाष याची मृतक ही दुसरी पत्नी असून पहिल्या पत्नी पासून तो वेगळा राहतो. त्याला पहिल्या पत्नी पासून एक मुलगा एक मुलगी सुद्धा आहे. पण त्याचा त्रासाला कंटाळून पहिली पत्नी त्याला सोडून माहेरी गेली. त्यानंतर त्याने दुसरी पत्नी केली होती पण तिची निर्घुण हत्या केली.
आरोपी फरार पोलिसांची शोध मोहीम:
पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यातून या खूनाचा भयंकर उलगडा होईल. सध्या आरोपी सुभाष फरार आहे. पोलिसांनी मृतदेह घरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे हिंगणघाट शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

