श्याम भूतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील माजलगाव तहसीलच्या वडवणी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील हे त्यांच्या चेंबरमध्ये आत्महत्या केल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ माजली आहे. विनायक चंदेल वय 45 वर्ष असे मृतक सरकारी वकीलाचे नाव असून ही घटना बुधवारी सकाळी घडली.
विनायक चंदेल यांचा मृतदेह त्यांच्या चेंबरमध्ये फासावर लटकलेला आढळून आला होता. यावेळी पोलिसांना घटनास्थळावर एक सुसाईड नोट मिळाली आहे ज्यावर त्यांनी दोन लोकांची नावे लिहिली आहेत. या प्रकरणात आता एक मोठी माहिती पुढे आली आहे. आत्महत्येपूर्वी विनायक चंदेल यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रफिक शेख आणि कार्यालयातील कारकून तरडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी येथे सरकारी वकिलाने न्यायालयातच आत्महत्या केली होती. या प्रकरणात आत्महत्या केलेल्या सरकारी वकिलाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून वडवणी पोलिसात वडवणी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रफिक शेख आणि कार्यालयातील कारकून तरडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यावरील न्यायाधीशाच्य विरोधात गुन्हा दाखल होण्याची कदाचित ही राज्यातील पहिलीच घटना असावी.
बीड जिल्ह्याच्या वडवणी येथील न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेले विनायक चंदेल यांनी दोन दिवसांपपूर्वी न्यायालयाच्या आवारातच आत्महत्या केली होती. मृतक विनायक चंदेल यांच्या खिशातून पोलिसांना सुसाईड नोट देखील मिळाली होती. मात्र पोलिसांनी सुरुवातीला यात आकसमिक मृत्यूची नोंद घेतली होती.
आता या प्रकरणात मयत विनायक चंदेल यांच्या मुलाने फिर्याद दिली असून त्यात वडवणी येथील न्यायाधीश रफिक शेख हे सातत्याने अपमानित करीत असल्यानेच विनायक चंदेल यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यावरून वडवणी पोलिसांनी न्यायाधीश रफिक शेख आणि न्यायालयातील कारकून तरडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने जिल्हाभरातील न्यायालयीन वर्तुळात खळबळ माजली आहे.

