हेल्पिंग हँड्स फाउंडेशन ट्रस्ट व जेसीआय बल्लारपूर वुड सिटी यांच्या संयुक्त उपक्रम.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दि. 23 ऑगस्ट रोजी हेल्पिंग हँड्स फाउंडेशन ट्रस्ट व जेसीआय बल्लारपूर वुड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने बैल पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी हेल्पिंग हँड्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे अध्यक्ष प्रकाश दोतपेल्ली, सचिव श्रीनिवास चेरकुतोटा, जेसीआय क्लबच्या अध्यक्षा प्रनिता कामपेल्ली, माजी अध्यक्ष वीना दोतपेल्ली प्रमुखा ने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांचा सत्कार करून मिठाईचे वाटप करण्यात आले.
तसेच पाडव्याच्या दिवशी तान्हा पोळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला लहानग्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या निकालामध्ये प्रथम रित्विका मध्यलवार, द्वितीय आराध्य गोंदे, तृतीय तनिश येनूरकर, चतुर्थ साई दोडरे, पाचवा ओमनी येगीनवार, सहावा दुर्गेश शेंडे, सातवा आराध्य सजनवार, आठवा सात्विक तेलकापेलिवर, नववा वीरांश मांधारे, दहावा हर्षा धोटे व अकरावा दक्ष गोहने यांना मिळाला. यावेळी सर्व वीजेतांना हेल्पिंग हँड्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे अध्यक्ष प्रकाश दोतपेल्ली, सचिव श्रीनिवास चेरकुतोटा, जेसीआय क्लबच्या अध्यक्षा प्रनिता कामपेल्ली, माजी अध्यक्ष वीना दोतपेल्ली यांचा हस्ते शील्ड व प्रमाणपत्र देन्यात आले.
यावेळी युगराज बोबडे, कैलाश खंडेलवाल, प्रदीप भास्करवार, अनूप कुटेमाटे, सुनील जैन, भावेश चौहान, देवीदास कामपेल्ली, उर्वशी चव्हाण, सुनील मालू,प्रेम यादव, श्याम मेश्राम, चंद्रमणी नगराले, उत्तम तेलंग, तिरुपति उशकलवार, शनमुख बुंदेल, वैभव धरनिवार, सुधीर कस्तूरवार, सरोज राऊत, आयशा शेख, प्रनिता पेन्दौर, विजेता आर्य, सुननता कदम, मंगला किरणे, फिरोज शेख, मनीषा दबेड़े, विजया रेडास आदींची उपस्थिती होती.

