अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आजादीचा अमृत महोत्सव या अंतर्गत हर घर तिरंगा अभियान शाळा स्तरावर राबवले गेले. २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम शाळेच्या स्तरावर घेण्यात आले. यामध्ये राखी मेकिंग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, तिरंगा रॅली, प्रश्नमंजुषा ,वक्तृत्व स्पर्धा, पसायदान इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात आले.
त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव एन. डी. डाहाके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी एनसीसी कॅडेट च्या विद्यार्थिनींनी संचालन केले व पाहुण्यांना सलामी दिली तसेच ५ ते १२ विद्यार्थ्यांनी कवायत खूप सुंदर रित्या प्रदर्शित केली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व्ही. डी. डहाके, डॉ. राहुल डाहाके, डॉ.ऐश्वर्या डहाके आणि स्वप्निल डहाके, सदस्या सौ. विनाताई डाहाके, यशपाल डहाके, कॅनरा बँकेचे मॅनेजर श्री. खैरकर, एनसीसी एन.ओ. सौ सोनालीताई डाहाके, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अटाळकर, ज्येष्ठ शिक्षक श्री. देशमुख, श्री.धुंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.

