सौ.हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:– जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संचालनालय पुणे यांचे तर्फे आयोजित तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत स्थानिक पोदार इंटरनॅशनल स्कूल, बल्लारपूर येथील विद्यार्थिनींनी १७ वर्षा खालील वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावला. संघात लिपी पटेल,पायल देशवाल, अबीरा शेख, एलिटा वर्मा, ख्याती सोलंकी, इशिका राय, काव्या कोडापे यांचा सहभाग होता.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक मयूर खेरकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीशा नायर आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

