हिंगणघाट यशवंत नगर (मास्टर कॉलनी), राम नगर वॉर्ड येथील रहिवाशांचा ४० ते ५० वर्षांचा घरपट्टेसाठी संघर्ष. उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्याला निर्देश देऊन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून घरपट्टे बाबत प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आदेश
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नगरपरिषद अंतर्गत यशवंत नगर(मास्टर कॉलनी),रामनगर वॉर्ड येथील नागरिकांनी अनेक वर्षापासून सुरू असलेला कायमस्वरूपी घरपट्टे संबंधित संघर्ष आता सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवीला आहे.
गेल्या ४० ते ५० वर्षांपासून या भागात मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या नागरिकांना अद्याप कायमस्वरूपी घरपट्टे मिळालेले नाहीत.
वारंवार अर्ज,कागदपत्र विविध स्तरावर निवेदने दिली मोठ्या प्रमाणावर प्रशासनाकडे मागणी करून अजूनही स्थायी पट्टे देण्यात आलेली नाही व कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता विकी वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंगणघाटला आले असता हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांच्या उपस्थितीत घरपट्टेच्या संघर्ष व सद्यस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली,त्यांचा संघर्ष ऐकल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला निर्देश देऊन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून घरपट्टे बाबत प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले व यशवंत नगर(मास्टर कॉलनी),राम नगर वॉर्ड येथील रहिवाशांचा ४० ते ५० वर्षांचा घरपट्टे साठी संघर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडण्यात आला.
फक्त आश्वासनाच्या ओझं आतापर्यंत अधिकाऱ्यांच्या वतीने यशवंत नगर (मास्टर कॉलनी), रामनगर वॉर्ड येथील नागरिकांच्या डोक्यावर टाकण्यात आले आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विकी वाघमारे यांनी निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनावर केले आहे, सर्वे करण्यात आला आहे, जागेचे मोजमाप केले असे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले, परंतु आता योग्य प्रक्रिया राबवून घरपट्टे साठी उपाययोजना केले नाही तर उपोषणावर बसून त्यांचा हक्का साठी लढणार.: सामाजिक कार्यकर्ते विकी उर्फ योगेंद्र लालाजी वाघमारे

