संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचांदूर:- येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोज मंगळवारला भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, चंद्रपूर व महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित केला होता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगाराविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या विभागाची निर्मिती केलेली आहे. समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने हा विभाग कार्य करतो. परिसरातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी नऊ कंपन्यांना निमंत्रित करण्यात आले होते. ज्यामध्ये ओमेंट वेस्ट प्रा.लिमिटेड, चंद्रपूर (५७ पदे), साई वर्धा पॉवर लिमिटेड, वरोरा (१५पदे), जे.पी. असोसिएट्स अँड लॅबोरेटरीस चंद्रपूर (२० पदे), गोपनी अँड आयर्न पॉवर लिमिटेड (१०पदे), विदर्भ क्लीक १ सोल्युशन चंद्रपूर (२००पदे), वैभव इंटरप्रिंसेस, नागपूर (६७०पदे), डिक्सन इंजिनीरिंग प्रा. ली.नागपूर (२० पदे), एस.बी,आय. लाईफ इन्शुरन्स चंद्रपूर फिल्ड वर्कर (१०० पदे), संसार श्रुष्टि इंडिया प्रा. ली. चंद्रपूर (५० पदे), इत्यादी कंपन्यांनी सहभाग घेतला. दिवसभर चाललेल्या या भरती प्रक्रियेत एकूण ४१६ बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग घेतला, तर या मेळाव्याच्या माध्यमातून १३२ जणांना नोकरी मिळवून देण्यात महाविद्यालयाला यश प्राप्त झाले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उदघाटन, कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय गोरे सचिव, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विशेष उपस्थितांमध्ये विकास भोजेकर, उपाध्यक्ष, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर, रामचंद्र सोनपितरे संचालक, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर तसेच राहुल बोढे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच मुख्यमार्गदर्शन राधिका गायकवाड, पीएसआय, गडचांदूर, राहुल बोधे संचालक, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर, अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास चंद्रपूर यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय गोरे सचिव, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर यांनी कार्यक्रमाला शुभेश्चा दिल्या.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेत डॉ. शैलेंद्र देव, प्राचार्य महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख स्पष्ट केला. कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल, डॉ. मनोहर बांद्रे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. पवन चटारे, महाविद्यालयातील समन्वयक यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक प्रा. पटले, प्रा. वानखेडे, प्रा. डॉ. खान, डॉ. शर्मा, डॉ. घोडिले, डॉ. मुन, प्रा. वैद्य तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.

