उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली दि 17:- 1949 बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट रद्द करावा, महाबोधी महाविहार बुद्धगया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मभूमी महू तसेच दीक्षाभूमी नागपूर येथील व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असावे या मागणी करता भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैन्य दलाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली महाविहार बुद्धगया आंदोलनाचे जनक अनागरिक धम्मपाल यांच्या जयंतीनिमित्त व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाच्या औचितत्याने आझाद मैदान मुंबई तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा, भिक्खू संघ, समता सैनिक दल, श्रामनेर बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, उपासक उपासिका, बहुजन समाजातील समविचारी संघटना, विविध मंडळे, बुद्ध विहारे यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलने व मोर्चे आयोजन करण्यात आले आहे.
याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आंबेडकरी जनसमुदाय व बहुजन समाजातील विविध संघटना यांच्या वतीने बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी आंदोलन करण्यात आले. व विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आले. यावेळी बौद्धांची धार्मिक स्थळे बौद्धांची ताब्यात द्या. या घोषणांनी पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून निघाला. यावेळी विविध वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सदर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास इथून पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाचे असेल असा इशारा देण्यात आला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा पूर्व पश्चिम यांचे पदाधिकारी रूपेश तामगावकर, कमलताई खांडेकर, संजय कांबळे,सुरेश कांबळे, विशाल, दत्तात्रय मोहिते, उल्का तामगावकर, सुनील खांडेकर, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे प्रशांत वाघमारे, संजय भुपाल कांबळे, जगदीश कांबळे, युवराज कांबळे, दीपक कांबळे, सुधीर कोलप, ऋषिकेश माने, पवन वाघमारे, दिलीप थोरवत, दिनेश लोखंडे, वंचित बहुजन आघाडीचे नितीन सोनवणे, विनायक मोरे, हिरामण भगत, शिराराणी कांबळे, जयाताई लोखंडे, सुनिता कामत, प्रिया कांबळे, दिपाली कांबळे, समता सैनिक दलाचे जितेंद्र कोलप, रतन तोडकर,चांगदेव कांबळे, सुहास कांबळे सांगली जिल्ह्यातील तासगाव मिरज आटपाडी कवठेमंकाळ, पलूस, शिराळा, वाळवा इत्यादी तालुक्यातील पदाधिकारी महिला उपासीका आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

