अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर :- २६ सप्टेंबर शुक्रवार ला संत तुकडोजी महाराज विद्यापीठ रवी नगर नागपूर येथे पार पडलेल्या विविध गटातील मैदानी स्पर्धेमध्ये सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेरच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
या स्पर्धेमध्ये (सीबीएसई बोर्ड) वयोगटानुसार गोळा फेक स्पर्धा -रियांशी गुरारीकर प्रथम क्रमांक,
लांब उडी स्पर्धा – आदिती चवारे प्रथम क्रमांक, उंच उडी स्पर्धा – आदिती चवारे व रजनीश यादव द्वितीय क्रमांक, १५०० मीटर धावणे स्पर्धा – रुद्र घोळसे द्वितीय क्रमांक, थाली फेक स्पर्धा – पलक गुरारीकर द्वितीय क्रमांक इत्यादी विद्यार्थ्यांनी पटकाविला.
तसेच स्टेट बोर्ड वयोगटानुसार गोळा फेक स्पर्धा – दानिश खान प्रथम क्रमांक, भाला फेक स्पर्धा – दानिश खान द्वितीय क्रमांक, उंच उडी स्पर्धा – आशरा शेख प्रथम क्रमांक,लांब उडी स्पर्धा – आशरा शेख द्वितीय क्रमांक विद्यार्थ्यांनी पटकविला.
या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक चंद्रकांत कोमुजवार सर,अक्षय घोरमारे यांना दिले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.अशोक जीवतोडे, सचिव डॉ.प्रतिभा जीवतोडे, संचालक रत्नाकरजी डहाके (पाटील), शाळेच्या मुख्यध्यापिका सौ.ममता अग्रवाल (सीबीएसई बोर्ड) व वैशाली देशपांडे (स्टेट बोर्ड), नितीन दोरखंडे, अक्षय नागपूरकर, प्रवीना पारसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृन्द यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

