मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर येथे दिनांक 6 ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान पार पडलेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत ॲमेच्यूअर जूडो असोसिएशन, हिंगणघाट च्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून सुवर्णपदके मिळवली. या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर या खेळाडूंची निवड राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धा 6 ते 8 नोव्हेंबर 2025 या कालावधीत खोपोली, अलिबाग, रायगड जिल्हा येथे पार पडणार आहे.
खेळाडूंची नावे, वयोगट आणि वजनगट पुढीलप्रमाणे आहेत
गट (Under 14):
1)शिव श्रीधर कोटकऱ – वजनगट -48 कि
2)सक्षम महेंद्र पब॔त – वजनगट -63 कि.
गट (Under 17):
1)प्रथमेश किशोर खोड़े – वजनगट -110 कि
मुलींचा गट (Under 17):
1)ईशा मनोज फाले– वजनगट -73 कि
ग्रीको-रोमन शैली (Under 17):
1)वैभव पद्माकर खोड़े – वजनगट -60 कि
2)तनुज नितीन मडावी – वजनगट -65 कि.
या सर्व खेळाडूंनी विभागीय स्तरावर सुवर्णपदक मिळवत हिंगणघाट शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल खेळाडूंचे विठ्ठलराव अवचट आणि राजूभाऊ अवचट यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या खेळाडूंना स्पर्धेसाठी तयार करण्यात प्रशिक्षक सुबोध महाबुधे आणि विशाल कस्तुरे यांचे मार्गदर्शन लाभले. सोबतच स्मित श्रावणे, सतीश वरघणे आणि श्रीधर कोटकर यांनी सुद्धा अभिनंदन केले. ॲमेच्यूअर जूडो असोसिएशन, हिंगणघाट तर्फे सर्व खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

