मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील कलोडे सभागृह समोरील अवैध झोपडपट्टीचे दुसरीकडे पुनर्वसनाच्या मागणीसाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर यशस्वी झाले. प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर झोपडपट्टी हटाव संघर्ष समिती आणि संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांनी अन्नत्याग उपोषणावर बसलेले दिलीप बालपांडे, राहुल झाडे, शितलताई राऊत, उमाताई भोयर यांनी तहसीलदार योगेश शिंदे, मुख्याधिकारी उरकुडे साहेब, ठाणेदार राऊत यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन उपोषण सोडले.
झोपडपट्टी हटाव संघर्ष समितीने प्रशासनाचे आभार मानले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवीण उपासे, समाजसेवक मोहम्मद रफीक, समाजसेवक सुनील डोंगरे यांच्यासह शहरातील प्रमुख नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

