मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संपूर्ण सिंधी समाजाच्या वतीने, हिंगणघाट भारतीय सिंधू सभा हिंगणघाट, अध्यक्ष किशन नेभानानी, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, सोनू आर्य आणि प्रल्हाद मोटवानी यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ नोव्हेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
छत्तीसगड प्रादेशिक जोहर पक्षाचे अध्यक्ष अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे पूजनीय दैवत भगवान झुलेलाल यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे निवेदन देण्यात आले. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारत, असे नमूद केले की, २६ ऑक्टोबर रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथे पत्रकार परिषदेत अमित बघेल यांनी जाणूनबुजून सिंधी समुदायाच्या भावनांचा अपमान केला आणि सिंधी समुदायाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली.
निवेदन देताना भारतीय सिंधु सभा चे सदस्य व सिंधी समाजाचे विनोद उदासी, संजय बुलानी, पवन सचवानी, अशोक बोधानी, राजेश लखानी, तीरथ दास मोटवानी, हिरानंद मोटवानी, दिलीप रहेजा, विक्की तकतानी, सुनील अमलानी, राजेश चंदानी, राजू मीहानी आणि सिंधी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

