उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली या संस्थेच्या कार्यकारणी संचालकांची निवड खेळी मेळीच्या वातावरणामध्ये उत्साहात करण्यात आली. सदर निवडी बिनविरोध आणि शांततेत पार पाडण्यासाठी विहाराचे माजी अध्यक्ष विलास उबाळे/ग्यनसेन त्याचप्रमाणे दीपस्तंभचे अध्यक्ष जगन कराडे यांनी मोलाचे प्रयत्न केले त्यांचे प्रयत्न बाबत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार्यकारी संचालक आणि पदाधिकारी तसेच सल्लागार मंडळ यांच्या निवड याप्रमाणे संचालक अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप, उपाध्यक्ष जगन्नाथ आठवले, सचिव पवन वाघमारे सहसचिव अवंतिका वाघमारे खजिनदार भारत कदम, सहखजिनदार सचिन कांबळे सदस्य संजीवकुमार साबळे, विकास भिसे, चंद्रकांत चौधरी, मालन शिरगुप्पीकर, संजय घाडगेपार, मित धम्मकीर्ती, चंद्रकांत नागवंशी सल्लागार मंडळ डॉ. जगन कराडे, धम्मचारी ज्ञानसेन, डॉ वैशाली पवार. प्रा. गौतम शिंगे, पी.एम.कांबळे

