युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे कौटुंबिक वाद आणि नात्यांतील गुंतागुंतीमुळे एका पुतण्याने स्वतःच्या काकाची निघृणपणे हत्या केल्याच्या घटनेने नागपूर हादरले आहे. ही घटना पारडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या तलमले वाडी भागात घडली. गोमा कृष्णराव कुंभारे वय 42, रा. गंगाबाग कॉलनी, पारडी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपीचे नाव कुणाल देवेंद्र कुंभारे वय 22, रा. नाईक तलाव, पाचपावली असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल कुंभारे याच्या आईने आपल्या पतीच्या भाऊ म्हणजेच दिराशी गोमा कुंभारे यांच्याशी पळून जाऊन लग्न केलं. या घटनेमुळे कुणालच्या मनात मोठा प्रमाणात राग आणि द्वेष निर्माण झाला. वडिलां सोबत राहणारा कुणाल आपल्या काकालाच आपल्या आयुष्याच्या उध्वस्त होण्यास कारणीभूत मानत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच तणाव निर्माण होत असे. घरातील या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांमुळे वारंवार वाद होत आणि कुणालने अनेकदा “तुला सोडणार नाही” अशी धमकी नेहमी देत होता.
मंगळवारी 6 नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास यांच्यात परत वाद झाला. सायंकाळी कुणाल आपल्या मित्र अमित भारती बरोबर पारडी परिसरात आला. घरात काका दिसले नाहीत म्हणून तो तलमले वाडी भागातील घाटाजवळ गेला, जिथे गोमा कुंभारे काही कामानिमित्त गेले होते. तिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि संतापाच्या भरात कुणालने खिशातून चाकू काढून काकाच्या छाती, मान व पोटावर वार केले. गंभीर जखमी झाल्याने गोमा कुंभारे जागीच कोसळले. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या गोमा यांना भवानीनगर रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
काकांची निर्घुण हत्या केल्यानंतर आरोपी कुणाल आणि त्याचा मित्र घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम राबवून दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं.

