मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809
दिनांक 12नोव्हेंबर 2025 गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा पलसपुर येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी श्यामनगर, शिमूलतला, विकासपल्ली येथील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक यांची समन्वय बैठक घेतली या बैठकीचे अध्यक्ष भारतीय जनता पक्ष जेष्ठ नेते बिरेन विश्वास उपस्थित होते यावेळी उपस्थितांना डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी मार्गदर्शन केले. व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व यावेळी डॉ. खुणे यांनी सांगितले बंगाली समाजाचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पक्षच करणार आहे, व बंगाली समाज हा आधीपासूनच भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहणारा समाज आहे व बंगाली समाज मेहनत करणारा व स्वतःच्या बळावर अस्तित्व निर्माण करणारा समाज आहे. येत्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस. माजी खासदार अशोक भाऊ नेते व आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली समस्त प्रलंबित समस्या प्रधान्यांनाने सोडवणार आहे असे प्रतिपादन केले व सांगितले पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निवडणुकीत समस्त समाज बांधवांनी भारतीय जनता पक्षासोबत राहावे व कोणताही भाजपा उमेदवार असेल.
ज्या उमेदवारास भाजपचे तिकीट मिळेल त्याच उमेदवारालाच सहकार्य करून बहुमताने निवडून आणावे असे आवाहन केले. यावेळी निरंजन ढाली,शामल दास, प्रताप मिर्धा.सुमेन विस्वास. अजित मुजुमदार. विकास मंडल. नलिन बार. सुकंठ रॉय. रमेन घरामी. अभिजय मंडल. गौरंग मंडल.तपण मिर्धा. बूथ प्रमुख पलाश घरामी.व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

