मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील जुन्या वस्तीतील वणा नदीच्या रिसरात सदगुरू दत्तात्रय मंदिरात ह.भ.प.मधुकरराव रघाटाटे यांनी दत्त मंदिरात अनेक वर्षा पासून एक तोफ सांभाळून ठेवली आहे. या तोफे बाबत रुपेश लाजुरकर यांना माहिती मिळताच त्यांनी हि माहिती ग्रुप वर शेयर केली आणि त्या तोफे बद्दल शोध मोहीम सुरू झाली. भोसले काळात हिंगणघाट मध्ये अनेकदा भोसले विरुद्ध गोंड राजे हि धूमशचक्री झाली आहे परंतु कोणतेही मोठे युद्ध हिंगणघाट मध्ये झाले नाही. मग हि तोफ हिंगणघाट मध्ये कशी आली असेल. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
या तोफेची लांबी 4 फूट 1 इंच असून त्याचा बोअर (तोंडीचे छिद्र) 2.5 इंच आहे तोफेचा बोअर (तोंडी) पासून मझल (बत्ती छिद्र) चे अंतर 3.5 फूट (42 इंच) आहे.
या बाबत प्रविण कडू यांनी तर्क मांडला हिंगणघाट मध्ये दुसरे रघुजी भोसले यांचे बंधू व्यंकोजी भोसले यांनी टाकसाळ पाडली होती त्या टाकसाळी चा कारखान्याला सुरक्षा देण्यासाठी हिंगणघाट येथे हि तोफ ठेवण्यात आली आहे असे मत व्यक्त केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधुकरराव रघाताटे यांनी या ऐतिहासिक वारसा जपला आहे , ऐतिहासिक वस्तू म्हणून या तोफेचा सांभाळ केला त्याबद्द्ल खूप खूप अभिनंदन आणि आभार ऐतिहासिक ग्रुप तर्फे मानण्यात आले .
या छोट्या तोफेला फाल्कनेट (Falconet) /Small fild Gun म्हणतात. हि भारतीय स्वदेशी शैलीची तोफ असून कारखाने, महसूली कार्यालये, चौक्या यांचा संरक्षणा करण्यासाठी अशा तोफेचा वापर भोसले काळात केला जात असे हिंगणघाट येथे भोसले काळात भोसले यांचा टाकसाळ कारखाना व चौकी होती त्यामुळे हि तोफ नागपूर भोसले संस्थान ची असावी या तोफेचा उपयोग संपल्या नंतर हि तोफ देवळात ठेवण्यात आली असावी अशी माहिती सुद्धा प्रविण कडू यांनी दिली.

