संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मागील अनेक वर्षांपासून नगर पालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या. पण काल गडचांदुर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान उत्साहात पार पडले. त्यात गडचांदुर नगर पालिका निवडणुकीत मतदानाच्या दिवशी एकीकडे ईव्हीएम मशीन फोडली, दुसरीकडे बोगस मतदान झाल्याने खळबळ माजली आहे.
गडचांदुरात बोगस मतदान: गडचांदूर येथे एका बुथवर मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराचे आधीच मतदान झाल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला. त्यानंतर या मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रभाग क्रमांक 04, अनुक्रमांक 71, खोली क्रमांक 03 या मतदान केंद्रावर एकूण 892 मतदार नोंदविलेले आहेत. याच केंद्रावर गडचांदूर येथील मतदार संतोष जगन्नाथ टोंगे यांचे मतदान आधीच झाल्याचे आधीच झाले होते. टोंगे मतदान केंद्रात पोहोचताच,आपले मतदान झाले आहे असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यानंतर नियमांनुसार त्यांच्याकडून छापीव्ह मतपत्रिकेद्वारे (टेंडर वोट) मतदान घेण्यात आले.
माझ्या मतदानाचा हक्क हिरावण्याचे काम निवडणूक विभागाने केले आहे. लोकशाही व्यवस्थेत अशी गळचेपी अत्यंत चिंताजनक आहे, असे टोंगे यांनी सांगितले. आम्ही त्यांचे बॅलेट पेपरवर मतदान करवून घेतले आहे. पुढील कारवाई निवडणूक आयोगाच्या स्तरावर करण्यात येईल, असे स्पष्टीकरण झोनल अधिकारी दिप्ती तेलंग यांनी सांगितले. यामुळे मतदान केंद्रावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

