युवराज मेश्राम प्रधान संपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथे आज पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात पडणाऱ्या थंडीत गर्मी वाढवणारे ठरणार आहे. यंदाचे अधिवेशन राज्याच्या विधिमंडळाच्यादृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. पण महाराष्ट्र आणि लोकशाहीसाठी ते भूषणावह नसेल. कारण यावेळी इतिहासात पहिल्यांदाच हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांशिवाय पार पडणार आहे. सध्या विधानसभेसह विधानपरिषदेतही विरोधी पक्षनेता नाही. विधानसभेत विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने ही नामुष्की ओढवली आहे.
फडणवीस शिंदे पवार यांनी विरोधकांना केलं चित: विधानसभा निवडणुकीत महायुती देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे पानिपत केले. इतक काय तर विधानसभा आणि विधान परिषद मध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतक्या जागा पण निवडून आणू दिल्या नाही त्यामुळे विरोधकांवर ही नामुष्की आली आहे.
विरोधी पक्षनेते किती संख्याबळ आवश्यक?विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यासाठी एका पक्षाकडे प्रत्येकी 10 टक्के आमदार असणे आवश्यक आहे. विधानसभेत हा आकडा 29 एवढा होता. मात्र, विरोधी पक्षातील एकाही पक्षाकडे एवढे संख्याबळ नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक 20 आमदार आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार आहेत त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळ नाही.
विधानपरिषदेत शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दावने हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत विरोधी पक्षनेते होते. मात्र, त्यांचा सदस्यपदाचा कार्यकाळ संपला आणि हे पद रिक्त झाले. तेव्हापासून विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता नाही. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसताना विधिमंडळाचे अधिवेशन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

