मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी:*- येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आले.
सकाळी निळा ध्वजाचे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते उमेश भारशंकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले, त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले व करण्यात आले त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्वपूर्ण व ऐतिहासिक जीवनावर प्रकाश टाकण्यात आले.
सायंकाळी भव्य भीम ज्योत रॅली काढण्यात आले. रॅलीत सिनेटचे सदस्या तनुश्रीताई आत्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथाचे दर्शन घेऊन अभिवादन केले तसेच रॅलीतही सहभागी झाले.
यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर, सचिव सुरेंद्र अलोणे, प्रशांत भिमटे, संदीप ढोलगे, संजय ओंडरे, रामचंद्र ढोलगे, देवाजी अलोणे, राजानंद दहागावकर, परशुराम दहागावकर आदी व बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.

