संबंधित मोबाईल टॉवर अधिकाऱ्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*अहेरी==*
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथील पोलीस स्टेशन हद्दीत बी. एस. एन. एल व जिओ टॉवर च्या विविध समस्या अति वेगाने वाढत आहेत.
टॉवर निर्माण करून अनेक वर्षे झाले आहे. परंतु त्या टॉवर ला कधी बॅटरी नसतात, कधी अचानक नेटवर्क कमी होतो. असे अनेक समस्या उद्भवत असतात, आता मात्र बिलकुल फक्त टॉवर शोभेची वास्तू बनून आहे.असा आज दिवसभर अनेक वेळा नेटवर्कची व नेटची समस्या सातत्याने होत असते,आज दिवसभर जिओ ची नेटवर्क गाडझोपेत असल्याने काही तासानंतर तातूरमातुर नेट मिळत असल्याने परिणामी विविध प्रकारे समस्या विध्यार्थ्यांना ऑनलाईन,अभ्यास करणे, या परिसरात शासकीय व प्रशासकीय ऑनलाईन कामे मोठया प्रमाणात असतात. लोकांना याचा मोट्या प्रमाणात त्रास सहन करावे लागत आहे. या डोकेदुखी पासून सुटका मिळावी म्हणून अनेक लोकांनी बी एस एन एल च्या सिम बंद करून एरटेल , जिओ आणि इतर सिम घेऊन उपयोग करायला सुरुवात केले आहे, तर काही लोक बी एस एन एल च्या नंबर अनेक ठिकाणी लिंक असल्यामुळे नाही लाजाने बी एस एन एल व जिओ त्याला पर्याय म्हणून इमर्जन्सी उपयोगासाठी म्हणून दुसरा सिमकार्ड घेऊन दोन _दोन सिम कार्ड घेऊन वापरात असल्यामुळे अनेक लोकांना अधिकच्या बर्दंड भरावा लागत आहे.
बी एस एन एल व जिओ च्या टॉवर ची समस्या लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मागणी परिसरातील मोबाईल धारकांनी केली आहे.

