मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत माझा देश आहे किवा हमारी राष्ट्रीय हा एका वाक्याचा विषय पण आज देशाच्या नागरिकांना मनात संभ्रम हेतूपूर्वक निर्माण करण्यात येत आहे भारत हा विविधतापूर्ण देश आहे ज्यात विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि उपासना पद्धती एकत्रितपणे नांदतात. पाश्चिमात्य देशांमध्ये राष्ट्रवादाची व्याख्या वेगळी असू शकते, परंतु भारताची राष्ट्रव्याख्या ही विविधता आणि एकतेच्या सूत्रावर आधारित आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये एकच धर्म किंवा संस्कृती असू शकते. स्वामी विवेकानंद म्हणतात की प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म पाहणारे माणूस हा भारतीय आहे. भारतात जन्म, मृत्यू, संस्कार आणि विचार हे धर्माने पाळले जातात. भारतात प्रत्येक गोष्टीमध्ये धर्म पाहणारा माणूस हा भारतीय आहे. काही लोकांच्या मते भारत हे 1947 नंतर जन्माला आलेले राष्ट्र आहे अशा प्रकारचा का देशात भ्रम पसरविला जात आहे परंतु ही कल्पना चुकीची आहे. भारताची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक धरोहर हजारो वर्षांपूर्वीची आहे. भारता चीन शिवाय इतर कोणत्या देशावर ४०० वर्षांपेक्षा जास्त काळ आक्रमण झाले नाही किवा कोणताही देश 2400 वर्ष जुना नाही भारत चीन वगळता. भारतीय संस्कृतीची मुळे 7000 वर्षांपूर्वीची आहे. आजही भारतीय लोकांना अजूनही 7000 वर्षाचे स्मरण आहे अन्य देशात सांस्कृतिक विस्मरण झाले आहे. असे विचार विदर्भ प्रांत प्रज्ञा प्रवाह प्रचार आयाम प्रमुख अंबरीष पुंडलिक यानी व्यक्त केले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त समाज जीवनावर प्रभाव असलेल्या प्रमुख नागरिकांच्या जनसंगोष्ठीचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिगणघाटच्या वतीने करण्यात आले होते. या संगोष्ठीमध्ये यानी ‘हमारी राष्ट्रीयता’ या विषयावर विचार मांडले. याप्रसंगी याप्रसंगी मंचावर जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, नगर संघ चालक विनोद नांदुरकर, यवतमाळ विभाग कार्यवाह अंकुश रामगडे, भारतीय विचार मंच हिंगणघाट नगर संयोजक दत्ता भांगे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अंबरीष पुंडलिक म्हणाले आज जगाला भारताची आवश्यकता आहे कारण जगात शांतता फक्त भारत निर्माण करू शकतो जग हे ग्लोबल मार्केट झालेले आहे पण भारतात वसुधैव कुटुंबकम पद्धत अजूनही मानली जाते. फ्रान्समध्ये ज्याप्रमाणे डावे उजवी संकल्पना आहे त्याप्रमाणे डावी उजवी संकल्पना ही भारताला लागू होत नाही, भारताची स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्था आहे. भारतातही ही संकल्पना लादण्याचा प्रयत्न खूप केला पण तो शक्य झाला त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ही संकल्पना मान्य नाही. काही लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उजव्या लोकांची संघटना म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक राष्ट्रवादी संघटना आहे जी भारताच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकतेच्या विचाराला समर्थन देते. संघाची विचारसरणी ही डावी-उजवी संकल्पनेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहित आणि सांस्कृतिक राष्ट्रवादावर केंद्रित आहे. संघाच्या भारतीय किसान संघ, विविध आयामांद्वारे देशातील विविध क्षेत्रातील नागरिकांसाठी काम केले जाते, ज्यामुळे संघाला केवळ उजव्या किंवा डाव्या विचार सरणीचा म्हणने चुकीचे आहे. संघाचे स्वयंसेवक अनेकदा म्हणतात की ते कोणत्याही विचार सरणीत अडकत नाहीत, तर फक्त राष्ट्राच्या हितासाठी काम करतात.
याप्रसंगी अंकुश रामगडे यानी पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन या विषयावर बोलताना म्हणाले ‘पंच परिवर्तन’ ही आज सर्वसामान्य समाजाची गरज आहे. समाजातील समरसतेचा आग्रह, पर्यावरणपूरक जीवनशैली, कौटुंबिक मूल्यांना चालना देण्यासाठी कौटुंबिक प्रबोधन, जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये ‘स्व’ अर्थात भारतीयत्वाचा आग्रह आणि नागरी कर्तव्यांच्या दृष्टीने समाजाचे प्रबोधन, यांसारख्या पंच परिवर्तनातुन राष्ट्रीय विचारांच्या प्रसाराला गती देण्यासाठी, त्याच्या कार्याला अधिक खोली आणि रुंदी देण्यासाठी स्वंयसेवक ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेसह सज्ज आहे. पंच परिवर्तन ही आजच्या काळाची आणि समाजाची विशेष गरज आहे. याकरिता समाजाला पंच-परिवर्तन म्हणजे समरसता, पर्यावरण, कुटूंब प्रबोधन , स्वदेशी जीवन आणि नागरी कर्तव्य या मूलभूत तत्त्वांशी परिचित होणे आवश्यक आहे. राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मूल्यांची पायाभरणीही याच माध्यमातून होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तावित व संचालन दत्ता भांगे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरमनी झाली तर शेवट राष्ट्रीयगान झाले यानंतर, सर्व अतिथींनी प्रदर्शनीचे निरीक्षण केले त्यानंतर अल्पहार व चाय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली, या कार्यक्रमाला नगरातील गणमान्य व्यक्ती तसेच नगर कार्यकारणी याची उपस्थिती होती.

