महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- नुसत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचे निकाल जाहीर झाले त्यात वंचित बहुजन आघाडीने इतिहासिक कामगिरी करत राज्यातील दोन नगर पालिकेवर नगराध्यक्ष पदासह 70 नगरसेवक पदावर वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी राज्यात एक प्रमुख पक्ष असल्याची चुनक दिसून येत आहे.
वंचित बहुजन आघाडीने प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या अधिकृत उमेदवार अख्तर खातून यांनी विजय मिळवला आहे.
नगरपालिका नगरपंचायतींच्या नगरसेवक पदांसाठी वंचित बहुजन आघाडीचे एकूण 70 नगरसेवक विजयी झाले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात 25, चांदूररेल्वे 5, अहिल्यानगर 5, संगमनेर 2, शेगाव 1, यवतमाळ 3, जळगाव जामोद 1, कंधार 1, नागपूर जिल्ह्यातील वाडी 4, कणकवली 1, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती 3 व गडिचरोली 1 आदी ठिकाणच्या नगरसेवकांचा समावेश आहे.
या यशाबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामागे महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते तसंच आजी – माजी पदाधिकारी आणि विशेषतः युवा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सर्वांनी पुढाकार घेऊन केलेली मेहनत बहुप्रतिक्षित यशाचे कारण ठरल्याचेही त्यांनी नमूद केले. हे यश सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले असून, निवडून आलेल्या प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे त्यांनी अभिनंदन केलं आहे.

