राजुरा येथील आदर्श शाळेत संत गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी. सेविका इंदिरा गुरुनूले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन.
संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने स्वच्छता अभियान व श्रमदान करून शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी आदर्श शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बादल बेले यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शाळेच्या सेविका इंदिरा गुरुनूले, आदर्श हायस्कूलच्या शिक्षिका पूजा डेंगळे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवन चरित्रावर विचार व्यक्त केले.
महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक, कीर्तनकार, स्वच्छतेचा प्रसार, अंधश्रध्दा निर्मूलन, शिक्षण प्रसार आणि दीन दलितांची सेवा यांवर संत गाडगे महाराजांनी भर दिला. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अज्ञान , अंधश्रद्धा व अस्वच्छता दूर करण्यासाठी त्यांनी जीवनभर प्रयत्न केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली.

