मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने दोन वरिष्ठ भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जारी केलेल्या सरकारी आदेशा नुसार, आयपीएस अधिकारी सौरभ कुमार अग्रवाल यांची त्यांच्या सध्याच्या पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), पुणे या पदावरून वर्धा येथील पोलिस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणू आयपीएस सौरभ कुमार अग्रवाल यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जनतेशी संवाद साधणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान, आयपीएस अधिकारी अनुराग जैन, जे आतापर्यंत वर्धा येथील पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते, त्यांची नागरी हक्क संरक्षण, नागपूर येथील पोलिस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे.
नव्याने पदभार स्वीकारलेले आयपीएस सौरभ कुमार अग्रवाल कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे या दिशेने त्यांचे कार्य नक्कीच उल्लेखनीय ठरेल, अशी अपेक्षा आहे.
वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.

