मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-“नर सेवा हीच ईश्वर सेवा ” हा संताचा पावन उद्देश साकार करीत नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट चे वतीने समाजसेवी रावजीभाई पटेल यांच्या जन्मदिवसा निमित्त निशुल्क नेत्ररोग तपासणी व मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन धनश्री नेत्रालय हिंगणघाट येथे करण्यात आले.
सदर शिबिरात ४१ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली व २२ रुग्णांची मोतीयाबिंदू शस्त्रक्रिये करीता निवड करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन समाजसेवी सन्नी पटेल, जाम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी स्वाद चहाचे संचालक अशोक मिहानी, डॉ.संजय उस्तवाल डॉ. शरद मद्दलवार, सीए श्यामकुमार करवा, गौतम कोठारी व मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. ओस्तवाल यांनी रुग्णांच्या डोळ्याची तपासणी करून २२ रुग्णांची मोतिया बिंदू शस्त्रक्रियासाठी निवड केली. यावेळी त्यांनी मोतिया बिंदूचे लक्षण आणि उपचार याबाबत विस्तृत माहिती रुग्णांना दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता धनश्री नेत्रालयाचे विशेष सहकार्य प्राप्त झाले.
या शिबिराच्या यशस्वीतेकरिता सचिव पराग मुडे, दुर्गाप्रसाद यादव, रूपचंद हेमनानी, निलेश भुतडा, राजू भगत, प्रा. लतिका बेलेकर, सौ भुतडा, किरण अग्रवाल, वीरश्री मुडे, भाग्यश्री खियाणी आदी नारायण सेवा मित्र परिवाराचे सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

