अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- पंचायत समिती सावनेर यांच्या वतीने सन २०२५–२०२६ या शैक्षणिक वर्षातील ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १६ डिसेंबर रोजी अभुदय ग्लोबल व्हिलेज स्कूल, बावनगाव येथे पार पडले. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सदर शाळेची विद्यार्थिनी कु. विधी अनिल अग्रवाल हिने स्टार्च बेस बायोडीग्रेडबल प्लास्टिक हे पर्यावरणपूरक मॉडेल सादर करून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, संस्थेचे सचिव डॉ. सौ. प्रतिभा जिवतोडे, उपाध्यक्ष श्री. अंबर जिवतोडे, संचालक श्री. रत्नाकर डहाके पाटिल, प्राचार्या सौ. ममता अग्रवाल, सौ. वैशाली देशपांडे, विज्ञान शिक्षक प्रणय कापसे, पद्मा हिरतकर, चंद्रकांत कोमुजवार, अमूल जीवतोड़े, प्रफुल नारनवरे, दिनेश निखाड़े तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

