श्री. साई कथाकार बाळकृष्ण महाराज सुरासे (शिर्डी) यांनी श्री.साई अथेचे सांगितले महत्व.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाटः- श्री साई प्रतिष्ठान द्वारा आयोजित श्री संत साईबाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दिन तसेच राजयोगी श्री संत लक्ष्मी माताजी यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री साई कथेचे आयोजन श्री साई मंदिर नंदोरी रोड येथे करण्यात आले होते. श्री साई कथाकार हभप बाळकृष्ण महाराज सुरासे (शिर्डी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून श्रोत्यांना श्री साई कथेचे महत्व सांगितले.
शिर्डीच्या साई बाबांचे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात भक्त आहे. ”सबका मालिक एक” हे साईंचे बोल आपणा सर्वांना ठाऊकच आहेत. साईंबाबानी जात, धर्म, पंथ, श्रीमंती आणि गरीबी असा कोणताही भेदभाव न करता गरजूंना मदत केली. अनेकांना संकटातून आणि अंधःकारातून प्रकाशाची वाट दाखवली. अनेकांना आपल्या शिकवणीने आणि ज्ञानप्रबोधनाने योग्य मार्ग दाखवणाऱ्या साई बाबांचे चमत्कारांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. साई बाबांनी त्यांच्या चमत्कारांनी अनेकांना धडा शिकवला तर काहींना योग्य ती शिकवण ही दिली. तसेच साई कथेचे महत्व कथाकार हभप बाळकृष्ण महाराज सुरासे (शिर्डी) यांनी सांगितले.
तसेच २३ डिसेंबर रोजी भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबीर देखील घेण्यात आले. याशिबिरात शहरातील पाचशे पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. व २४ डिसेंबर ला महाप्रसादाने श्री साई कथेची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर महाराज, सचिव अतुल वांदिले यांच्यासह श्री साई समितीचे सर्व पदाधिकारी, साई सेवक, साई सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

