प्रशांत जगताप मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांना जवळून बघणाऱ्या कृषी मंत्रालय नवी दिल्ली माजी आयुक्त डॉ. कृपाकर वासनिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील वासनिक यांच्या मातोश्री “पुष्पाबाई प्रल्हाद वासनिक” यांचं वयाच्या 84 व्या वर्षी 27 डिसेंबर 2024 रोज निधन झाले होते. आज त्याचा पहिल्या स्मृती दिनानिमित्त माजी कृषी मंत्रालयात आयुक्त, नवी दिल्ली, लेखक विचारवंत डॉ. कृपाकर वासनिक लिखित “पुष्पांजली” पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. श्याम तागडे, आयएएस (निवृत्त) माजी, गृह सचिव, महाराष्ट्र राज्य, श्री. संजय मेश्राम आमदार उमरेड, श्री. मनोहर चंद्रिकापुरे माजी आमदार, श्री. श्रीमंत माने संपादक लोकमत नागपूर, ॲड. सिद्धार्थ कांबळे संपादक बहुजन सौरभ नागपूर, डॉ. दीपक खोब्रागडे प्रमुख मराठी विभाग डॉ. आंबेडकर महाविद्यालय नागपूर आणि अध्यक्ष डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्य महामंडळ नागपूर, श्री. अनिरुद्ध शेवाळे गायक आणि प्रबोधनकार नागपूर, डॉ. केवलराम तितीरमारे सहकार नेते धनला, तालुका कुही यांच्या उपस्थितीत हा पुस्तक प्रकाशन सोहळा नागपूर येथे पार पडणार आहे.
स्मुतीशेष पुष्पाबाई वासनिक यांनी सुरुवातीला भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील धानला या गावात त्यांनी आपल्या पती बरोबर आपल्या संसार सुरू केला. त्यानंतर त्यांना 3 मुल आणि 3 मुली झाल्या. त्याच काळात दलीत वंचित समाजासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाची चळवळ जोमाने सुरू होती. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग त्यांना आला. भारताच्या स्वातंत्र्य नंतर लगेच 1954 मधे झालेली लोकसभेची पोटनिवडणूक भंडारा मतदारसंघातून डॉ. बाबासाहेबांनी लढवली. त्या वेळेस स्वतःच्या प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर पवनीला आले असताना पहिल्यांदा या थोर युगपुरुषाला त्यांनी पहिले. पुष्पाबाई त्यावेळेस 15 वर्षांची होत्या. डॉ. बाबासाहेब यांचा विचार घेऊन काहीही झालं तरी वेळेप्रसंगी एक वेळ उपाशी राहिलो तरी चालेल पण आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना उच्च पदी विराजमान करायचं हेच ध्येय घेऊन हजारो आई बाप आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी झपाटलेले होते. त्याच काळात पुष्पाबाई वासनिक यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिलं. त्यात डॉ. कृपाकर वासनिक हे नवी दिल्ली मध्ये कृषी मंत्रालयात आयुक्त पदी विराजमान झाले. दुसरा मुलगा दिपांकर वासनिक हे पण उच्च शिक्षण घेऊन पुण्यात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. तिसरा मुलगा सुनील वासनिक हे पण सामाजिक राजकीय चळवळीत अग्रेसर आहे.
डॉ. कृपाकर वासनिक लिखित “पुष्पांजली” पुस्तकात “पुष्पाबाई प्रल्हाद वासनिक” यांचे कार्य, आंबेडकरी चळवळीत योगदान, सामाजिक कार्य, शिक्षणासाठी एक झटलेली आई यावर लिखाण करून आजच्या या समाजाला एक मार्गदर्शक म्हणून ठरणार आहे.

