स्व.काकूंच्या विचारांच्या सर्वांना सोबत आणणार – योगेश क्षीरसागर
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. इच्छुकांच्या भेटी आणि त्यांच्याशी चर्चा करून नियोजन केले जात आहे. शुक्रवारी वडवणी, धारूर, माजलगाव येथे झालेल्या इच्छुकांच्या बैठकांना प्रचंड मोठा प्रतिसाद दिसून आला असून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी या भाजपा स्वबळवरच लढवणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले. तर जिल्ह्यात लोकनेत्या स्व.केशर काकू यांना मानणार, त्यांच्या विचारावर चालणार मोठा वर्ग जिल्ह्यात असून त्यांना भाजपच्या प्रवाहात घेऊन पक्षाची ताकद वाढविणार असल्याचे निवडणूक प्रभारी युवानेते योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले. त्यानंतर लगोलग भाजपाने आपलं लक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक नियोजनावर आपले लक्ष केंद्रीत करत जिल्हाभरात इच्छुकांच्या भेटी गाठी आणि संवाद साधण्यासाठी बैठकांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक प्रभारी युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत वडवणी, धारूर व माजलगाव येथे इच्छुकांच्या बैठका घेण्यात आल्या. आज झालेल्या बैठका मध्ये भाजपा कडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड मोठी गर्दी दिसून आली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख म्हणाले की लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद निवडणूकित मोठे यश मिळाले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकित भाजपचाच झेंडा फडकवायचा आहे. कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी यांनी जोमाने कामाला लागावे. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर जरी असली तरी देखील आपल्या नेत्या पंकजा मुंडे स्वतः जातीने लक्ष घालून जो उमेदवार देतील तोच आपला उमेदवार असेल. कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे. ही बाब जरी खरी असेल तरी देखील निवडणूक स्वबळावर लढायची की युतीत हा निर्णय आपल्या पंकजा मुंडे याच घेतील. राज्यात आणि देशात आपली सत्ता आहे याचा उपयोग ग्रामीण भागातील लोकांना होण्यासाठी एकदिलाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. तर या निवडणुकीचे प्रभारी युवानेते योगेश क्षीरसागर यांनी जुन्या नव्या लोकांना सोबत घेऊन येणारी निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आ.केशव आंधळे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, शांतिनाथ डोरले, गणेश लांडे, प्रमोद पुसरेकर, बंसीधर मुंडे, माधव निर्मल, बाळासाहेब चोले, सोमनाथ बडे, दीपक मुंडे, अनिल चोले, विश्वनाथ घाटे, दिनकर आंधळे, डॉ. स्वरूपसिंह हजारी, शिवाजी अप्पा मुंडे, संदीप काचगुंडे, गणेश बडे, रूपाली कचरे- मंडळ अध्यक्ष, ज्ञानेश्वर मेंडके, नितीन रांजवण, डॉ. प्रकाश आनांदगावकर, डॉ. अभिजित सोळंके, विनायक रत्नपारखी आदी उपस्थित होते.

