अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- इंडियन मेडिकल असोसिएशन , सावनेर शाखेच्या वतीने २५ डिसेंबर २०२५ ला “हास्यरंग- २०२५” हे अशे बहारदार हास्यकवी संमेलन आयोजित करण्यात आले. दैनंदिन वैद्यकीय सेवेत व्यस्त असलेल्या डॉक्टरांना व त्यांच्या कुटुंबियांना मनमुराद हास्याचा डोज देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आय. एम. ए. सावनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. परेश झोपे यांची उपस्थिती लाभली.
यावेळी हास्यकवी संमेलनात हास्यकवी श्री. गौतम गुडधे, श्री. संजय कावरे, श्री. गजानन मते, श्री. गोपाल मापारी आणि डॉ. स्वप्नील मानकर यांनी आपल्या खुसखुशीत कविता, विनोदी अनुभव व सामाजिक आशय असलेल्या रचनांद्वारे प्रेक्षकांना अक्षरशः खळखळून हसवले. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांची दाद मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयएमचे सचिव डॉ. प्रविण चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी मोठ्या संख्येने आयएमचे सदस्य डॉ.स्मिता भूडे (उपाध्यक्ष) डॉ.शिवम पुनियानी (कोषाध्यक्ष), डॉ.विजय धोटे, डॉ.ज्योत्स्ना धोटे, डॉ.विजय घटे, सौ.नंदा घटे, डॉ.चंद्रकांत मानकर, सौ.रजनी मानकर, डॉ.विनोद बोकडे, डॉ.करुणा बोकडे, डॉ. निलेश कुंभारे, डॉ.सोनाली कुंभारे, डॉ. उमेश जिवतोडे, डॉ.आशीष चांडक, डॉ.रेणुका चांडक, डॉ.विलास मानकर, डॉ.गौरी मानकर, डॉ.सचिन घटे, सौ.मीनल घटे, डॉ.गुंजन धुंदेले, डॉ.तनू धुंदेले, डॉ.अमित चेडे, सौ.दुर्गा चेडे, डॉ.नितीन पोटोडे, डॉ.मोनाली पोटोडे, सौ.चित्रा झोपे, श्री.सतीश भुडे आणि आणि मोठ्या प्रमाणात कुटुंबीय उपस्थित होते.
आय.एम.ए. सावनेर शाखेच्या या सांस्कृतिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

