राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- काल मुंबई महानगर पालिका निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याचा आखरी दिवशी काँग्रेस- रासप- वंचित बहुजन आघाडी या आघाडीला तब्बल 16 प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित नव्हता. परिणामी या 16 प्रभागांमध्ये उमेदवारी देताना काँग्रेसला मोठी धावपळ करावी लागली.
मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्रित निवडणुका लढवत आहेत. 227 पैकी 153 काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी 63, रासप 12 जागा लढवणार, असे बैठकीत निश्चित झाले होते. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला 16 प्रभागांमध्ये उमेदवार मिळू शकला नाही. या जागा ‘वंचित’कडे गेल्याने तेथे काँग्रेसने उमेदवार शोधून ठेवले नव्हते.
मुंबई महानगर पालिका मधील प्रभागात काँग्रेसने आम्हाला ज्या जागा दिल्या, तिथे वंचित बहुजन आघाडीचे संघटन नसलेल्या प्रभागांच्या होत्या. त्यामुळे आम्हाला ऐनवेळी उमेदवारांची वानवा निर्माण झाली. आम्ही त्या जागा काँग्रेसला परत केल्या, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले. ‘वंचित’ने परत केलेल्या 16 प्रभागांमध्ये काँग्रेस उमेदवारांनी शेवटच्या दिवशी नामांकने सादर केली आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. मुंबईत काँग्रेसचे 167 उमेदवार झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसशी आघाडी करताना 62 मतदारसंघ कोणते याची यादी केली होती. त्या यादीवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. बहुतांश अनुसूचित जातीचे प्रभाग वंचितकडे गेल्याने काँग्रेसमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. वंचितला सोबत घेतल्याने काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज होत्या. त्या आघाडीची घोषणा करताना गैरहजर होत्या.
1999 नंतर महाराष्ट्रात काँग्रेसची आणि रिपाइं पक्षाशी आघाडी झाल्याबद्दल मोठ्या वल्गना करण्यात आल्या होत्या. महापालिका जिंकल्यात जमा आहे, असे काहींना वाटत होते. मात्र नामांकन सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित आणि काँग्रेसने जो गोंधळ बघायला मिळाला त्यावरुन ही आघाडीत बिघाडी तर होणार नाही? वंचितने सोडलेल्या 16 जागांवर काँग्रेसने अपक्षांना एबी फॉर्म देवून उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे. एकाएका जागांच्या रस्सीखेचामध्ये गेला महिनाभर वंचित आणि काँग्रेस नेत्यांनी आघाडी तोडण्याच्या जाहीर बाता केल्या होत्या.

