निवेदन देताना पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर गोंगले व पदाधिकारी उपस्थित होते.
*अहेरी ==*
माजी राज्यमंत्री तथा आमदार श्रीमान डॉ, धर्मरावबाबा आत्राम
विषय :-
राजाराम, व कमलापूर परिसरातील विविध समस्या लक्ष्यात घेऊन तात्काळ समस्या सोडविण्याबाबत.
महोदय:-
सविनय विनंती करण्यात येते कि, राजाराम परिसरात खालील अडचणी येत असून सदर समस्याच्या लक्षात घेऊन युवा पत्रकार संघटनेचे वतीने आपणास निवेदन सादर करण्यात येत असून खालील समस्या त्वरित सोडवण्याची विनंती करण्यात येत आहे.
१)गोलाकर्जी,राजाराम ते छल्लेवाडा,कमलापूर,रेपनपल्ली २०की, मी चा डांबरीकरण रस्ता करण्यात यावी.
२)राजाराम येथील B S N L व जिओ स्टॉवर ची सीमा वाढविण्यात यावी.
३)राजाराम, कमलापूर परिसरातील विविध विभागातील कर्मचारी मुख्यालयी राहून देण्यात यावी.
४)जल मिशन योजने अंतर्गत हरघर नळ शासनाने लाखो रुपये खर्च करून टाकीचे काम बांधकामासाठी करण्यात आले परंतु अद्याप नळ सुरु करण्यात आले नाही.
५)रोजगार हमी योजनेचे काम सुरु करण्यात यावे.
६)कमलापूर येथे ३३ के,व्ही, जणीत्र उभारण्यात यावी.
७)आलापल्ली ते सिरोंचा राष्टीय महामार्ग तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी.
८)आदिवासी व बिगर आदिवासी यांना वनहक्क पट्टा मंजूर करण्यात यावी.
9)राजाराम येते आदिवासी विविध सहकारी कार्यकारी संस्था च्या वतीने आधार भूत धान खरेदी केंद्र सुरु करणे.
इत्यादी समस्या निराकरण करण्याकरीता युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मधुकर गोंगले, संतोष बोम्मावार, श्रीधर दुग्गीरालापाटी, रमेश बामनकर, सुरेश मोतकूरवार, मोहसिन शेख, राकेश येलकुंची, राजेश कुंमरे,इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

