आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान व परिसराच्या सौंदर्यीकरण कामांचा आढावा घेण्यासाठी आज संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यासोबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकास कामांची सखोल पाहणी करून कामांच्या गुणवत्ता, प्रगती व अंमलबजावणीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाला साजेसे, नागरिकांसाठी स्वच्छ, सुरक्षित व आकर्षक असे उद्यान विकसित करण्याच्या दृष्टीने हरितीकरण, स्वच्छता, प्रकाशयोजना व पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याबाबत चर्चा करण्यात आली. शहराच्या सौंदर्यात भर घालणारे व नागरिकांना विरंगुळा व सकारात्मक वातावरण देणारे हे उद्यान आदर्श ठरावे, यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे.
हिंगणघाटच्या सर्वांगीण विकासासोबतच सार्वजनिक जागांचे जतन व संवर्धन करत नागरिकांना अधिक सुविधा देण्यासाठी अशा पाहणी दौऱ्यांद्वारे कामांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

