अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-९८२२७२४१३६
सावनेर:- येथील साई मंदिरात श्री. साईबाबा पुण्यतिथी महोत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. विजयादशमी हा श्री. साईबाबांचा समाधी दिवस असल्यामुळे सकाळी पासून मंदिरात श्री चा अभिषेक, हवन, पूजा व आरती करण्यात आली. ढोल, ताशे, घोडे, दिंडी फटाक्यांची आतिषबाजी करीत श्रीची पालखी काढण्यात आली. ही पालखी यात्रा बस स्टॅन्ड, गांधी चौक, गडकरी चौक, बाजार चौक, होळी चौक घेत वापस श्री. साईबाबा मंदिरा मध्ये पोहोचली. श्री च्या पालखीसोबत हजारो भक्तांचा समावेश होता.
सांप्रदायिक हरिपाठ मंडळ म्हसे पठार यांच्या दिंडीने भक्तांचा उत्साह वाढविला.प्रत्येक दिवशी श्रीची आरती, साई दर्शन पूजाअर्चना व भजनाचा कार्यक्रम पार पडला. ७ ऑक्टोबरला सकाळी ८ ते ९ वा.पूजा व आरती करण्यात आली.सायंकाळी ५ ते ७ वा.पर्यंत आर्ट ऑफ लिविंग परिवारांतर्फे भजन संध्या चा कार्यक्रम पार पडला.सायंकाळी ८ ते १० वा.पर्यंत ह भ प श्री हरिचंद्र पाणीमहाराज वंजारी लाडगाव यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.
८ ऑक्टोबरला सकाळी ८ ते ९ वा.पर्यंत श्रीची आरती व पूजा.दुपारी ३ ते ६ पर्यंत ह भ प श्री.हरिचंद्र महाराज वंजारी( लाडगाव) यांचे काल्याचे किर्तन पार पडले. सायंकाळी ७ ते १० पर्यंत श्रीच्या भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रामरावजी मोवाडे, चुडामण धुंदे, रमेश दिवटे, प्रशांत ठाकरे, संजय मानकर, दत्ताभाऊ धोटे, परसराम गायधने, दिलीप धुंदे, प्रकाश बुटे, भाऊराव ठाकरे, आत्माराम कमाले, ललित जुंनघरे, निलेश चेटुले, ज्ञानेश्वर बोबडे, पंकज महाजन, आनंद काळबांडे, उमेश सातपुते, सुमीत लाडसे, तुषार निंबाळकर, अभिषेक नेरकर, मयूर नेऊरकर, नानाभाऊ बोबडे, निलेश सोलंकी, चंद्रकला मोवाडे, पार्वतीबाई अडकिने, चंद्रकला गायधने व मंजुळा खंगार इत्यादींनी परिश्रम घेतले.