मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक रोड:- पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलिसांनी शोध मोहीम राबवून दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. गुन्हे शोध पथकाचे पथकाचे कर्मचारी विशाल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी योगेश हिरामण जाधव रा. अशोकनगर, सातपूर व आदित्य शैलेश पालवे रा. सिडको यांच्याकडून नाशिकरोड व इंदिरानगर परिसरामधून चोरी झालेल्या तीन मोटरसायकल हस्तगत केल्या.
मोटरसायकल प्रतिबंधक पथक व नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने गेल्या चार महिन्यांमध्ये दोन विधी संघर्ष बालक व १७ संशयितांना आतापर्यंत अटक करून त्यांच्याकडून २३ लाख वीस हजार रुपये किमतीच्या ६९ दुचाकी जप्त केल्या आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ आदींनी वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक गणेश न्याहदे, राजू पाचोरकर, सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, गुन्हे शोध पथकातील हवालदार अनिल शिंदे, सुभाष घेगडमल, अविनाश जुंद्रे, विष्णू गोसावी, राकेश बोडके, केतन कोकाटे, सोमनाथ वाजे, विशाल वर, महेंद्र जाधव, योगेश रानडे, विनोद लखन, विशाल पाटील, मनोहर शिंदे, अजय देशमुख, स्वप्नील जुंद्रे, सचिन रामराजे यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

