मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली:- सर्वत्र आनंदाच्या उत्सव दिवाळी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दिनांक 26 ऑक्टोंबरला दीपावली पाडवा तथा भाऊबीजचे औचित्य साधून आम आदमी पक्षाच्या तालुका देसाईगंज यांच्या वतीने मौजा कोंढारा येथील गरीब व्यक्तींच्या घरी जाऊन ज्यांना सहा ते नव महिन्याचे मुल आहेत अशा मुलांना चालण्यात आणि पाळण्यास सहकार्य व्हावे व शक्य तितक्या लवकर मुल चालण्यास शिकावी या हेतूने लहान मुलांना चलन यंत्र वाटप करण्यात आले तसेच मिठाई देऊन दिवारीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेरी गडचिरोली जिल्ह्याच्या आपचे उपाध्यक्ष प्रकाश जीवानीच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष भरत दयलाणी, महीला तालुका उपाध्यक्ष विद्याबाई कांबरे, महासचिव, दिपक नागदेवे, शहर अध्यक्ष आशिष घुटके, शहर सचिव ,तब्रेज खान यश कुकरेजा अतुल ठाखरे, नाजुक लूटे तथा आम आदमी पक्षाचे अनेक कार्यकर्ता व गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

